Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विधानसभा निवडणुकांच्या निकाला नंतर सर्व विजय मिरवणुकांवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर किंवा निकाला नंतर सर्व विजय मिरवणुकांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. कोरोंना रुग्ण संख्येत होत असलेल्या मोठ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमधील सर्व प्रचारसभा आणि मिरवणूकांवर या आधीच  बंदी घालण्यात आली  आहे. दरम्यान निवडणुकांच्या निकालानंतरच्या मिरवणुका आणि जल्लोषावर निवडणूक आयोगानं घातलेल्या बंदीचं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वागत केलं आहे.

या निर्णयाचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी आपल्या पक्षाच्या, राज्य घटकांना दिले आहेत. कोरोंना संकटाच्या या काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी भाजपाचे सर्व कार्यकर्ते आपली शक्ती वापरत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version