Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड मनपाची निःशुल्क अँम्ब्युलन्स सेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी वरील नंबर आपण देत आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व BVG MEMS (Maharashtra Emergency Medical Services) यांच्या संयुक्त विद्यमाने सदरची सेवा पुरविण्यात येणार आहे. यापुर्वी सगळ्यांना ज्ञात असलेला १०८ क्रमांक व मनपा ०२०-६७३३११५४ / ०२०-६७३३२१०१ या क्रमांकावर फोन केल्यास आपणास तातडीने अँम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार आहे. जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे सोयीस्कर होणार आहे. सदरचा निर्णय मा.आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी घेतलेला आहे. सदरची हेल्पलाईन २४X७ उपलब्ध असणार आहे. सदरची संपूर्ण सेवा निःशुल्क असणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

 शववाहिका (स्मशानभूमी समन्वय) सेवा (०२०-६७३३११५५)

पिंपरी चिंचवड मनपाने यापूर्वीच कोरोना आजाराने मृत पावलेल्या रुग्णांसाठी स्मशानभूमीतील प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी सदरची हेल्पलाईन सुरु केलेली आहे. जेणेकरुन कोणत्या जवळच्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णास नेऊन अंतिम संस्कार करता येतील व प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी सदरची सेवा २४X७ सुरु आहे.

Exit mobile version