नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत 29 लाख 78 हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन असून एकूण बाधितांच्या संख्येमध्ये हे प्रमाण 16 पूर्णांक 55 शतांश टक्के आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातलं रुग्ण बरे होण्याचा दर घसरत असून सध्या तो 82 पूर्णांक 33 शतांश टक्क्यांवर आला आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 61 हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 48 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 3 हजार 293 जणांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. एका दिवसातली मृत्युंची ही सर्वाधिक संख्या आहे.