नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या नोंदणीला काल संध्याकाळी सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी ३३ लाख नागरिकांनी नोंदणी केली.
या नोंदणी दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, यासंदर्भात काल माध्यमांमधे परसलेलं वृत्त आधारहीन आणि खोटं आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
कोविन पोर्टलला सध्या दर सेकंदाला सुमारे ५५ हजारजण भेट देत आहेत. त्यानंतरही पोर्टल स्थीर असून, नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्याच्यादृष्टीनं पोर्टलचं सर्व्हर सक्षम असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.