Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शिवसेनेच्या वतीने थेरगाव मध्ये कोविड केअर सेंटर : ॲड. सचिन भोसले

मातोश्री कोरोना कोविड केअर सेंटरचे पुढील आठवड्यात उद्‌घाटन

पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीमध्ये राज्यातील लाखो नागरीक बाधित झाले आहेत. या दुस-या लाटेत पिंपरी चिंचवड मधिल वाढत्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मनपाची सर्व रुग्णालये रुग्ण दाखल करण्यास कमी पडत आहेत. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) शिवसेनेच्या वतीने थेरगांव येथिल कैलास मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शहर शिवसेना प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

थेरगाव येथिल कैलास मंगल कार्यालयात सत्तर रुग्णांची मोफत आयसोलेशनची व्यवस्था करण्यात येणार आहे. येथे दाखल होणा-या रुग्णांना शिवसेनेच्या वतीने चहा, नाष्टा, पाणी, जेवण आणि आवश्यक सुविधा मोफत देण्यात येईल. तसेच येथे दाखल रुग्णांना 24 तास गरम पाणी, मोफत रुग्णवाहिका, मोफत वाय – फाय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रुग्णांची देखभाल करण्यासाठी चोविस तास सहा डॉक्टर, दहा परिचारिका, दहा वॉर्ड बॉय आणि मावशी, एक व्यवस्थापक आणि आवश्यक कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.

पुढील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर आणि संपर्क प्रमुख बाळाभाई कदम यांच्या उपस्थितीत या मातोश्री कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन होणार आहे, अशीही माहिती शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Exit mobile version