नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ला पायबंद घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवरचे दिशानिर्देश येत्या ३१ मे पर्यंत लागू राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
सर्व राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्याची कठोर अंमलबजावणी करावी, कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातल्या यथोचित तरतुदींचा वापर करावा असे निर्देशही दिले आहेत. १० टक्के पेक्षा जास्त संसर्गित लोकसंख्या किंवा उपलब्ध खाटांपैकी ६० टक्के खाटांवर रुग्ण दाखल असणं, यापैकी एक निकष पूर्ण करणारे जिल्हे हुडकून काढून तिथे कडक निर्बंध लागू करावे असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.