Site icon साप्ताहिक एकच ध्येय

फेडरल बँकेमार्फत लस साठवणूकीसाठी रेफ्रिजरेटरचे वितरण व उद्घाटन ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ

पुणे : फेडरल बँकेच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत कोविड- १९ लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी १०० रेफ्रिजरेटरचे वितरण व उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाले.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, फेडरल बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोविड लस एका विशिष्ठ तापमानात ठेवणे गरजेचे असते, ते तापमान कायम राखण्यासाठी शीत यंत्राची गरज असते. आता 18 ते 44 वयो गटातील लोकांना आज लसीकरण सुरु झाले असून या वयो गटात खूप मोठी लोकसंख्या आहे. ही संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने लसीकरण नियोजन केले आहे, त्यावेळी हे रेफ्रिजरेटर वापरले जाणार आहेत.

Exit mobile version