Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज प्राप्त झालेल्या रशियाच्या लसीमुळे भारताच्या लसीकरण मोहिमेला वेग येईल, आणि कोरोना विरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे.

पहिल्या खेपेत रशियाकडून आपल्याला दीड लाख स्पुटनिक लसींच्या कुप्या मिळाल्या आहेत, तसंच  लसींचा  मोठा साठा लवकरच भारतात पोहोचणार असल्याचं ते म्हणाले. भारत- रशिया दरम्यान दीर्घ काळ असलेल्या धोरणात्मक संबंधांचा त्यांनी अभिमानानं उल्लेख  केला आणि लवकरच स्पुटनिक व्ही लसीचं देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचा  सरकारचा  विचार  असल्याचं बागची यांनी सांगितलं.

रशियाची  लस भारतात पोहोचल्याबद्दल  रशियाचे भारतातले राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी  आनंद व्यक्त  केला आहे. यामुळे भारतातली कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात  यायला मदत होईल, तसंच  कोविड विरोधातले भारत  आणि रशियाचे एकत्रित  प्रयत्न यापुढेही सुरु राहतील असं ते म्हणाले.

Exit mobile version