केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16.37 कोटीहून अधिक लशीच्या मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना मोफत उपलब्ध करून दिल्या
Ekach Dheya
अजूनही 79 लाखांपेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे नियोजनआणि वापरासाठी उपलब्ध आहेत
येत्या तीन दिवसात सुमारे 17 लाख अतिरिक्त मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध होतील
नवी दिल्ली : केंद्र सरकार, कोविड19 विरोधातला लढा आघाडीवर राहून लढत आहे. कोविड विरोधातल्या लढ्यातील पंचसूत्री धोरणातला लसीकरण हा अविभाज्य भाग आहे. (या पंचसूत्रीत लसीकरणाव्यतिरिक्त चाचणी, माग काढणे, उपचार आणि कोविड रोखणारे वर्तन यांचा समावेश आहे.)
लसीकरणाला वेग देण्यासाठी खुले धोरण स्विकारत तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीला आज सुरुवात झाली. (1 मे 2021) नव्या पात्र गटाच्या नोंदणीला 28 एप्रिलपासून सरुवात झाली आहे. पात्र लाभार्थी थेट CoWIN पोर्टल (cowin.gov.in) किंवा आरोग्यसेतू अॅपद्वारे नोंदणी करु शकतात.
केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16.37 कोटीहून अधिक (16,37,62,300) लशीच्या मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना मोफत उपलब्ध केल्या आहेत. यापैकी, अपव्यय धरुन एकूण 15,58,48,782 मात्रा देण्यात आल्या आहेत. (आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार).
अजूनही 79 लाखांपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक मात्रा (79,13,518) राज्यांकडे नियोजनासाठी उपलब्ध आहेत.
याशिवाय, येत्या तीन दिवसात सुमारे 17 लाख अतिरिक्त मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध होतील.
आधीच सांगीतल्याप्रमाणे गतीशील आणि व्यापक लसीकरण धोरणाच्या तिसऱ्या टप्प्यात, सर्व राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना केन्द्राच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या एकूण लशीच्या मात्रांबाबत केन्द्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सविस्तर माहिती दिली जाते. 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना मोफत लशीच्या मात्रा उपलब्ध केल्या जातात.
पुढील तक्त्यात केन्द्र सरकारने, राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना मोफत उपलब्ध केलेल्या लशीच्या मात्रांबाबत माहिती दिली आहे.
राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेश यांना कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लशीचे मे 2021च्या पहिल्या पंधरवड्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेले वाटप.