मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६३ हजार २८२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख ६५ हजार ७५४ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ३९ लाख ३० हजार ३०२ रुग्ण बरे झाले.
राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४ पूर्णांक २४ शतांश टक्के झालं आहे. सध्या राज्यात ६ लाख ६३ हजार ७५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.कोरोना संसर्गानं आतापर्यंत ६९ हजार ६१५ रुग्ण दगावले असून सध्या राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ४९ टक्क्यावर आला आहे. राज्यात आतापर्यंत तपासलेल्या २ कोटी ७३ लाख ९५ हजार २८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक ३ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात काल ७७१ रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यात काल ५२० नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात काल ५, तर आतापर्यंत ६६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.लातूर, जिल्ह्यात काल १ हजार ५८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात काल १ हजार २९० नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १२ हजार ४३२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल या आजारामुळे २९ रुग्ण दगावले.
नाशिक जिल्ह्यात काल बरे झालेल्या ६ हजार रुग्णांना घरी पाठवलं. जिल्ह्यात काल ३ हजार ४१२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात काल या आजारानं ३८ रुग्णांचा बळी घेतला.सांगली जिल्ह्यात काल १ हजार ३९ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात काल १ हजार ३२७ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या जिल्ह्यात १३ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल ३६ रुग्णांनी आपला प्राण गमावला.
परभणी जिल्ह्यात काल १ हजार २११ रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली. जिल्ह्यात काल १ हजार ७२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. सध्या जिल्ह्यात ८ हजार २६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात काल १९ रुग्णांचा मृत्यू झाला
हिंगोली जिल्ह्यात काल १६६ रुग्णांनी या आजारावर मात केली. काल १९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात १ हजार ३४२ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात काल या आजारामुळे ६ रुग्ण दगावले.
नांदेड जिल्ह्यात काल १ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ५८४ नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १० हजार १७८ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल २२ रुग्णांचा बळी गेला.
वाशिम जिल्ह्यात काल ३८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात काल ४२८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला. सध्या ४ हजार ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला.
चंद्रपूर, जिल्ह्यात काल १ हजार २६५ रुग्णांनी वर मात केली. जिल्ह्यात काल १ हजार १२५ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १६ हजार ४२० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात काल २४ रुग्णांनी आपला प्राण गमावला.
जालना जिल्ह्यात काल ४८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ५३४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या जिल्ह्यात ६ हजार १७६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल २५ रुग्ण दगावले.