नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात रविवारी ३ लाख ६८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळले. ३ लाख ७ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ३ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत १ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून, सध्या ३४ लाख १३ हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ८१ पूर्णांक ७६ शतांश टक्क्यावर आला आहे. या संसर्गानं आतापर्यंत २ लाख १८ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १५ कोटी ७१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. रविवारी १२ लाख १० हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस दिल्याचंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.