Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत रब्बी गव्हाची आतापर्यंत २९२ लाख मेट्रीक टन गहू खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांमार्फत रब्बी गव्हाची खरेदी किमान हमी भावानं सुरु आहे. चालू हंगामात आतापर्यंत २९२ लाख मेट्रीक टन गहू खरेदी झाला असून गेल्या वर्षीच्या या कालखंडात झालेल्या खरेदीच्या तुलनेत तो ७० टक्के जास्त आहे.

किमान हमी भाव योजनेचा फायदा यंदा सुमारे २९ लाख शेतकऱ्यांना झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय, की यंदा प्रथमच पंजाब आणि हरयाणातल्या शेतकऱ्यांना गव्हाचा चुकारा बँक खात्यात थेट जमा झाला आहे. पंजाबमधे आतापर्यंत १७ हजार कोटी तर हरियाणात ९ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

Exit mobile version