पिंपरी : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव यांनी मोरवाडी, पिंपरी येथील व सांगवी येथील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मोरवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक सभापती तुषार हिंगे, नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, उपअभियंता विजय भोजणे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रुपनर, सदाशिव पडळकर, माणिकराव बारगळ, नागेश तितर, भुजंग दुधाळे, अजित चौधरी, विकास माने आदि मान्यवर उपस्थित होते.
सांगवी येथे सकाळी झालेल्या या कार्यक्रमास ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या माई ढोरे, आशा धायगुडे – शेंडगे, नगरसदस्य संतोष कांबळे, हर्षल ढोरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, बाबासाहेब चितळकर, सुधाकर सुर्यवंशी, सचिन सरक, नारायण मदने, अभिमन्यू गाडेकर, मनोजकुमार मारकड, दिनेश गाडेकर, विठठल वागदरे, भालचंद्र मेटी, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.