मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षमता आहेत, ते समाज, देश आणि मानवतेला मोठं योगदान देऊ शकतात असं प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. याचे कोश्यारी यांनी स्मरण दिले. नांदेडमधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३वा दीक्षांत समारोह आज ऑनलाईन पद्धतीनं झाला त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी पदवी मिळवल्यानंतरही आपलं शिक्षण सुरुच ठेवलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं.
विद्यापीठानं देशात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं, आणि ऑक्सफर्ड प्रमाणेच नांदेडला सर्वोत्तम गुवणत्तेचं केंद्र बनवावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. रामकृष्णन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन हे देखील दिक्षांत समारोहात सहभागी झाले होते.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्यात कसं राबवायला हवं, यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला कृती दल, येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.