पुणे : सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास योजना (ग्रामीण) घरकुल निर्माण समितीच्या वतीने घरकुल योजनेचा महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आढावा घेतला.
विधान भवन सभागृह येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे उपस्थित होते.
रमाई आवास योजनेची स्थिती, ग्रामीण क्षेत्रात निवड केलेल्या अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांची संख्या व योजनेला आणखी गती देण्यासोबतच पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी योजनेचा आढावा घेतला.
रमाई आवास योजनेंतर्गत 435 पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये आंबेगाव 36, बारामती 109, दौंड 39, हवेली 29, इंदापूर 96, जुन्नर 51, खेड 40, मावळ 6, मुळशी 9, पुरंदर तालुक्यातील 20 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.