कोरोना चाचणीसाठी मागणी वाढल्यानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे सुधारित सूचना जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचणीसाठी मागणी वाढल्यानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुधारित सूचना जारी केल्या आहेत.रॅपिड अँटीजेन किंवा आरटी-पीसीआर यापैकी कोणत्याही चाचणीद्वारे पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णावर आरटीपीसीआर चाचणी पुन्हा करु नये.
रुग्णालयातून सुटी देताना बरे झालेल्या व्यक्तिंची कोणतीही चाचणी करण्याची आवश्यकता नाही.सुदृढ व्यक्ती राज्यांतर्गत प्रवास करत असतील तर त्यांची चाचणी करु नये.अनावश्यक प्रवास आणि आणि लक्षणं असलेल्या व्यक्तिंचा राज्यांतर्गत प्रवास पूर्णपणे टाळावा.
रॅपिड अँटीजेन चाचणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सर्व उपलब्ध आणि सरकारी आणि खासगी सुविधांमध्ये त्याची परवानगी देण्यात यावी.शहरं, गावं आणि खेड्यांमध्ये समर्पित आरएटी बुथ्स शक्य त्या ठिकाणी उभारावेत आणि ते चोवीस तास चालू ठेवावेत अशाही सूचना परिषदेनं दिल्या आहेत.