Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई महापालिकेने लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं विशेष खबरदारी घेत वरळी इथं लहान मुलांसाठी ५०० खाटांचं जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली.

पालिकेला सीएसआर फंडामधून मिळालेल्या ५० कोटी रुपयांच्या निधिमधून हे केंद्र उभारलं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जुलै – ऑगस्टच्य़ा दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका जाणवू शकतो असे मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Exit mobile version