नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देत परदेशातून मदत सामग्री भारतात आणण्यासाठी भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर कार्य सुरु आहे. समुद्र सेतू मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, नौदलाचे त्रिकंड हे जहाज आज कतारवरून ४० मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन मुंबईत दाखल झाले.
फ्रान्ससोबत नौदलाचा युद्ध सराव सुरु असताना कोरोना संबंधित वैद्यकीय सामग्रीची मदत घेण्यासाठी विविध भारतीय युद्धनौकांना आखाती देशांमध्ये वळवण्यात आले.कोविड महामारीत भारताला मदत करण्यासाठी ‘ऑक्सिजन एकता पूल’ या फ्रेंच अभियानाच्या माध्यमातून हा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.
द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणण्यासाठी क्रायोजेनिक कंटेनर्स घेऊन हे जहाज पाच मे रोजी कतारमधल्या हमद बंदरावर दाखल झालं होतं. त्यांनतर आज तर मुंबईत दाखल झाले. या अभियानानंतर्गत येत्या २ महिन्यात ६०० मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणला जाणार आहेत.