Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पारंपरिक शेतीतील खर्च कमी आणि उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजारांचे संशोधन करावे

नगरविकासमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला ओळख मिळावी

मुंबई : गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन करावे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेचे बळ देतानाच ती कमी खर्चाची आणि उत्पादन वाढविणारी असावी यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजार संशोधन करावे, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

नागपूर‍ विभागीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी विविध मुद्दे मांडले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली  जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रासाठी मांडलेले मुद्दे असे:

तेलंगणा येथून खतांचा पुरवठा करण्याची परवानगी द्यावी

मोहफुलांचा वापर पोषक आहारासाठी करावा

धान साठवणुकीसाठी गोदामांची संख्या वाढवावी

स्ट्रॉबेरी शेतीला चालना मिळावी

Exit mobile version