जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं राज्यांना वाटप
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्याकरता जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य रितीनं वाटप केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
यात ६ हजार ७३८ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स, ३ हजार ८५६ ऑक्सिजन सिलेंडर, १६ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ५ हजार ६६८ व्हेंटिलेटर्स, रेमेडेसीव्हीर या इंजेक्शनच्या ३ लाखहून अधिक मात्रांचा समावेश आहे. यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला हातभार लागेल असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.