Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य शासनं १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसीतून ४५ वर्षांवरच्या नागरिकांना दुसरा डोस देणार – आरोग्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सीन या लशीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता. १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण काही दिवसांसाठी कमी करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. त्यामुळे या वयोगटासाठी खरेदी केलेल्या, या लशीच्या सुमारे ३ लाख मात्रा, दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असलेल्या ४५ वर्षांवरच्या नागरिकांना दिल्या जातील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

ते आज मुंबईत बातमीदरांशी बोलत होते. सध्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असलेल्या अश्या नागरिकांची संख्या ५ लाखापेक्षा जास्त आहे. लसीचा प्रभाव अबाधित राहावा यासाठी चार ते सहा आठवड्याच्या निर्धारित कालावधीत दुसरा डोस देणं महत्वाचं आहे, असं ते म्हणाले.

सध्या राज्यात लागू असलेले कडक निर्बंध १५ मेनंतर पुढं वाढवणार का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितलं की, लॉकडाऊनबाबत उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. म्युकर मायकोसिस आजारावरच्या इजेक्शनच्या १ लाख कुप्या राज्य शासन खरेदी करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

Exit mobile version