Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत आहे. काल ३ लाख २९ हजारापेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली, ३ लाख ५६ हजारपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ३ हजार ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला.

देशात आतापर्यंत १ कोटी ९० लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्तीचा दर ८२ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशात ३७ लाख १५ हजारापेक्षा जास्त एक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत एक्टीव्ह रुग्णांचं प्रमाण १६ पूर्णांक १५ शतांश टक्के आहे.

देशात या संसर्गानं आतापर्यंत २ लाख ४९ हजारापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version