Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ पूर्णांक ६७ शतांश टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं घसरत असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढतो आहे. काल राज्यात ४० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर त्यापेक्षा, बरे झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३१ हजारांनी जास्त म्हणजे ७१ हजार ९६६ इतकी आहे. काल ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ७९ हजार ९२९ जणांना कोरोनाची करोना झाली. त्यापैकी ४५ लाख ४१ हजार ३९१ बरे होऊन घरी गेले. तर, ७७ हजार १९१ रुग्ण दगावले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ४९ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत तपासलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक ३५ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Exit mobile version