भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला जगभरातून मदतीचा हात
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला जगभरातून हातभार मिळत असून अनेक देशांतून मदतीचा ओघ सुरू आहे. जर्मनीतून २२३ व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीरच्या २५ हजार कुप्या आणि इतर औषध तसंच नेदरलँडसकडून ३० हजार रेमडेसिवीर कुप्या, आणि पोर्तुगालमधून ५ हजार ५०० कुप्या घेऊन येणारे विमान आज सकाळी भारतात पोहोचले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी, युरोपीय संघातील मित्र राष्ट्रांनी केलेल्या मदतीबद्दल या देशांचे आभार मानले आहेत. कझाकीस्तानमधून आज ५६ लाख मास्क आणि श्वसन यंत्र भारतात पोहोचले आहेत. कॅनडाने पाठवलेली ३०० व्हेंटीलेटर्सची मदतही आज भारतात येऊन पोहोचली. अरिंदम बागची यांनी या सहकार्यासाठी संबंधित देशांचे आभार मानले आहेत.