Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घेतली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनाविषयक स्थिती आणि कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेविषयी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. कॅबिनेट सचिव, प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव, गृहमंत्रालय, आरोग्य मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, जैवतंत्रज्ञान विभाग, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.

घरोघरी जाऊन कोरोनासंबंधीच्या चाचण्या आणि तपासणी करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपकरणं हाताळण्याचं प्रशिक्षण द्यावं, ग्रामीण क्षेत्रातल्या आरोग्यविषय सुविधा वाढवण्यावर भर द्यावा, अंगणवाडी कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करावं, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

दरम्यान आज संध्याकाळी प्रधानमंत्री तौक्ते चक्रीवादळासंबधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक महत्वाची बैठक घेणार आहेत. सरकार तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

Exit mobile version