Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात १८ कोटीपेक्षा जास्त लसीकरण करून भारतानं ओलांडला महत्त्वाचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १८ कोटी पेक्षा जास्त कोविड१९ प्रतिबंधात्मक लसीचे डोस देऊन भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये ९६ लाख २७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर ६६ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

आघाडीवर राहून काम करत असलेल्या १ कोटी ४३ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी पहिला डोस तर १ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले की, आज सकाळी ८ वाजेपर्यंत १० लाख ७९ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना कोविड१९ प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले. त्यापैकी ६ लाख १६ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस आणि ४ लाख ६२ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना या लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

Exit mobile version