Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लस पुरवठादारांची साखळी निर्बंधमुक्त असायला हवी – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी आणि दूत कॅथरीन ताई यांच्यासोबत, कोविड१९ प्रतिबंधक लसींचं उत्पादन वाढवण्यासंदर्भात ऑनलाईन माध्यमातून चर्चा केली. कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि न्याय्य पद्धतीनं लसींची उपलब्धता वाढवायला हवी यावर या चर्चेत भर दिला गेला.

संपूर्ण जगाला लसींची गरज असल्यानं लस पुरवठादारांची साखळी निर्बंधमुक्त असायला हवी असं गोयल यांनी चर्चेदरम्यान नमूद केलं. लसींची उपलब्धता वाढावी यासाठी एकसामाईक उपयोजना करण्यावर, उभय पक्षांनी सहमती दर्शवली.

Exit mobile version