बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तराफांवर काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. बार्ज पी ३०५ या तराफेवर गेल्या दोन दिवसांपासून मदत आणि बचावकार्य सुरू होतं.
त्यातल्या १८८ जणांना सुरक्षितरित्या आयएनएस कोची द्वारे मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात नौदलाला यश आलं आहे. मात्र यावर काम करणाऱ्या २२ जणांचे प्राण वाचवता आलेले नाहीत. अजूनही बचाव कार्य पूर्ण झालेलं नसल्याचं नौदलानं कळवलं आहे.