कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २४०६१.९२ मेट्रीक टन अन्नधान्याचे मोफत वाटप
Ekach Dheya
पुणे : राज्य शासनाकडून प्राप्त नियतनापैकी माहे मे २०२१ करीता जिल्हयासाठी ७७५६.४६ मेट्रीक टन गहू व ४९३५.८८ मेट्रीक टन तांदूळ असे एकूण १२६९२.३४ मेट्रीक टन अन्नधान्य वाटप करणेत आलेले आहे. आज अखेर राज्य शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे ६१.३३ टक्के वाटप करणेत आलेले आहे. तसेच केंद्र शासनाकडून प्राप्त नियतनापैकी माहे मे २०२१ करीता जिल्हयासाठी ६८२१.४४ मेट्रीक टन गहू व ४५४८.१४ मेट्रीक टन तांदूळ असे एकूण ११३६९.५८ मेट्रीक टन अन्नधान्य वाटप करणेत आलेले आहे. आज अखेर केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्याचे ५६.९७ टक्के वाटप करणेत आलेले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या प्राप्त अन्नधान्याचे जिल्ह्यात १८ मे २०२१ अखेर २४०६१.९२ मेट्रीक टन अन्नधान्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत लाभार्थ्यांना महिना अखेर पर्यंत १०० टक्के अन्नधान्य वितरण करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावास प्रतिबंध होणेकरीता टाळेबंदी तसेच रात्रीच्या कालावधीसाठी संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आर्थिक सहाय्य अंतर्गत राष्ट्रीय अन्नुसरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सवलतीच्या दराने पात्र असलेल्या लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना १ महिन्याकरीता मोफत गहू व तांदूळ वाटपाबाबत आदेश देणेत आलेले आहेत. तसेच केंद्र शासनाच्या २६ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये माहे मे व जून २०२१ करीता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्या व्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करावयाचे आदेश प्राप्त झालेले आहे.
अन्नधान्य विहित वेळेत वितरण करणेकामी पुणे शहर व गाम्रीण करीता नियोजन आले असून राज्य व केंद्र शासनाच्या दोन्ही योजनांचे धान्य वेळेत अन्न महामंडळाच्या गोदामातून उचल करून दोन्ही योजनांचे धान्य प्रत्यक्षात वाटप करण्यासाठी स्वस्तधान्य दुकानात पोहोच करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः वेब व्हीडिओ कॉन्फरन्स मार्फत सर्व तहसिलदारांना सूचना देवून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच सर्व तहसिलदार व परिमंडळ अधिकारी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे रास्तभाव दुकानदारांच्या बैठका घेवून लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरणाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अन्नधान्य वितरणबाबत सूचना देणेत आलेल्या असल्याची माहितीही जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली आहे.