Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील सुमारे सहाशेपैकी १८८ लोकांना सुरक्षितपणे वाचवल्यानंतर आयएनएस कोची जहाज मुंबईला परतले. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेनंतर या जहाजारीवरील धाडसी वीरांनी या लोकांना सुखरुप परत आणले, मात्र या बार्जवरील ३७ जणांचा या दुर्घटनेत मृत्यु झाला. ३८ कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत.

आयएनएस कोचीचे कमांडीग ऑफिसर, कॅप्टन सचिन सेक्वेरा यांनी तळावर परतल्यानंतर बातमीदारांना सांगितलं की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही मोहिम पार पाडण्यात आली. दृश्यमानता अतिशय कमी, वाऱ्याचा ताशी १०० किलोमीटरचा वेग आणि ९ ते १० मीटर उंच लाटांमुळं ही मोहीम अतिशय आव्हानात्मक बनली होती.

समुद्रातील स्थिती आता सुधारली असून, शोध आणि बचाव कार्य अद्याप सुरु असल्याचं सांगताना कॅप्टन सिक्वेरा म्हणाले की आयएनएस तेग, आयएनएस बेटवा, आयएनएस बियास आणि विमानांद्वारे जीवित व्यक्तिंचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

Exit mobile version