पुण्यात ऑक्सीजन, बेड्स आणि रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध – उपमुख्यमंत्री
Ekach Dheya
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यात कोविड रुग्णांची संख्या घटत आहे. ऑक्सीजन, बेड्स आणि रेमडेसिवीरचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितले. मात्र तिसरी लाट नको, म्हणून सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुंलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पुढच्या दहा दिवसात परिस्थिती पाहुन लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. पुण्यात ३०० हून अधिक काळ्या बुरशीचे रुग्ण आढळले आहेत. यावरील इजेक्शचा मात्र तुटवडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षीच्या निसर्गवादळापेक्षा तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात मोठे नुकसान झाले असून केंद्राने गुजरातप्रमाणे इतर राज्यांना देखील मदत द्यावी असेही पवार यावेळी म्हणाले.