Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १० ते ३० जून दरम्यान होणार असल्याची माहिती माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. केंद्रीय नियमाक मंडळानं परवानगी न दिल्याने राज्यातल्या वैद्यकीय ऑनलाईन परिक्षा  घेता येऊ शकत नाही, असंही देशमुखांनी स्पष्ट केलं.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस, बी.डी.एस, बी.ए.एम.एस, बी.यु.एम.एस, बी.एच.एम.एस, बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

या वैद्यकीय पदवी परीक्षां सोबतच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही याच कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Exit mobile version