देशभरात कोरोना लसीकरणाच्या 20 कोटींहून अधिक मात्रा दिल्या गेल्या
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजवर कोरोना लसीच्या 20 कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख 39 हजारहून अधिक कोरोना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. तर सलग 13 व्या दिवशी देशात कोवीड संसर्गाच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 95 हजार जण या आजारातून बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 2 कोटी 43 लाखांच्या पुढे गेली असून रुग्ण बरे होण्याचा दर 89 पूर्णांक 66 दशांश टक्के झाला आहे.
तर देशात उपचाराखालील रुग्णांची संख्यादेखील कमी होत असून दुसर्यार लाटे दरम्यान हा दर 9 पूर्णांक 18 दशांश टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 8 हजार नवबाधित आढळले असून सध्या देशात 24 लाख रुग्ण उपचाराखाली आहेत. तर याच कालावधीत 4 हजार 157 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकंदर मृतांची संख्या 3 लाख 11 हजार झाली आहे. तर काल एकाच दिवशी 20 लाख 17 हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या असून एकंदर चाचण्यांची संख्या 33 कोटी 48 लाख झाली आहे.