मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७६ शतांश टक्के झालं आहे. राज्यात काल ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २४ हजार १३६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तपासलेल्या ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ पूर्णांक ७७ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. म्हणजेच एकूण ५६ लाख २६ हजार १५५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले. तर, ९० हजार ३४९ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ३ लाख १४ हजार ३६८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातला मृत्यूदर मात्र किंचित वाढला असून, तो आता १ पूर्णांक ६१ शतांश टक्के झाला आहे. मुंबईत काल १ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, १ हजार ३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ९९ हजार ९०४ झाली आहे. यापैकी ६ लाख ५५ हजार ४२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनाबळींची एकूण संख्या १४ हजार ७०८ झाली आहे. सध्या मुंबईभरात २८ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईचा कोरोना मुक्तीदर ९४ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून ३४५ दिवसांवर पोचला असल्याचं पालिकेच्या आरोग्य प्रशासनानं कळवलं आहे.