Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गंगा नदीत कचरा टाकण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी ड्रोनद्वारे टेहळणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पवित्र गंगा नदीत कचरा टाकण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी वाराणसीत प्रशासनाकडून ड्रोनद्वारे टेहळणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या उपक्रमाची काल सुरुवात करण्यात आली. कोणीही गंगा नदीत कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितलं. याद्वारे गंगेच्या घाटावर देखरेख करून नियंत्रण ठेवलं जाणार आहे.

Exit mobile version