देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांच्या वर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या संख्येत दैनंदिन घट सुरूच असून रुग्ण बरे होण्याचा दर ही सातत्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 2 लाख 11 हजार दोनशे 98 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर काल 2 लाख 83 हजार एकशे 35 रुग्ण या आजारातून बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या 2 कोटी 46 लाख 33 हजार नऊशे 51 झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांच्या वर गेला असून रुग्ण वाढीचा दर 8 पूर्णांक 84 शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या 24 लाख 19 हजार नऊशे 7 रुग्ण या आजारासाठी उपचार घेत आहेत तर काल 3 हजार आठशे 47 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकंदर संख्या 3 लाख 15 हजार दोनशे 35 झाली आहे. काल दिवसभरात 21 लाख 57 हजारांच्या वर कोविड चाचण्या करण्यात आल्या असून एकंदर चाचण्यांची संख्या 33 कोटी 69 लाखांच्या वर गेली आहे.