नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता. २ लाख ७६ हजार रुग्णांनी काल दिवसभरात कोविडवर मात केली तर नवीन बाधितांची संख्या काल १ लाख ६५ हजार ५५३ होती. रुग्ण बरे होण्याचा दर देशात ९१ पूर्णांक २५ शतांश टक्के झाला आहे.रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याचं प्रमाण आता ७ पूर्णांक ५८ शतांश टक्के झालं आहे. नवबाधितांचं दैनंदिन प्रमाण ८ टक्के असून गेले सलग ६ दिवस ते १० टक्क्यांपेक्षा कमी राहीलं आहे.
सध्या सुमारे २१ लाख रुग्ण उपचाराधीन आहे, तर आतापर्यंत २ कोटी ५४ लाख रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. कोविडमुळे काल दिवसभरात ३ हजार ४६० रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत एकूण ३ लाख २५ हजार ९७२ रुग्ण दगावले आहेत.
देशभरात कोविड चाचण्याही वेगाने होत असून कालच्या दिवसात २० लाख ६३ हजार नमुन्यांच्या चाचण्या ICMR ने केल्या. आतापर्यंत ३४ कोटी नमुन्यांचा टप्पा ओलांडला आहे. त्याकरता १ हजार २६४ सरकारी आणि १ हजार ३२५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.