रेमडेसिविर या औषधाचं उत्पादन वाढल्यामुळे, केंद्र सकारकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेमडेसिविर या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. या औषधांच उत्पादन 10 पटीने वाढले असून देशाची उत्पादनक्षमता प्रतिदिन 33 हजार कुप्यांवरून ३ लाख ५० हजार कुप्यांवर आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात या औषधाचा पुरेसा साठा असून त्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात खूपच जास्त आहे, अशी माहितीही मांडविय यांनी दिली. मांडविय यांनी रेमडेसिविरच्या देशातील उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय औषध दरनिश्चिती संस्था आणि सीडीएससीओ ला दिले आहेत. तर आकस्मिक गरजेसाठी राखीव साठा म्हणून भारत सरकारनं रेमडेसिविरच्या 50 लाख कुप्या खरेदी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.