Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘वॉटर लिली’या ‘इटीव्ही’चे नौवहन मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते जलावतरण

मुंबई : इमरजन्सी टोईंग वेसल (इटीव्ही) म्हणजेच आपतकाळामध्ये जहाजांच्या मदतीसाठी म्हणून तैनात कराव्या लागणा-या मोठ्या नौवहनाचे जलावतरण आज केंद्रीय नौवहन मंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. या नौवहनाचे ‘वॉटर लिली’ असे नामकरण केले आहे. नौवहन महासंचालनालय आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉटर लिली’ची निर्मिती करण्यात आली आहे. दोन्ही संस्थांनी पाच वर्षांसाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे.

सागरामध्ये हवामानामुळे काही अडचण निर्माण झाल्यास जहाजांना मदत करण्यासाठी अशा प्रकारच्या ‘इटीव्ही’ला तैनात करण्याचे कार्य भारत सरकारच्या वतीने 2011 पासून नौवहन महासंचालनायलाच्या मार्फत केले जाते.

गेल्या काही वर्षांपासून नैऋत्य मौसमी पावसाच्या काळात भारतीय किनारपट्टीवर ‘इटीव्ही’तैनात केले जात आहे.

यावर्षी नौवहन संचालनायाच्या वतीने इटीव्हीने सातत्याने केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे संपूर्ण वर्षभर अशी मदतीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता आगामी पाच वर्षे मुंबई, आणि चेन्नई या बंदरामध्ये वर्षभरासाठी ‘इटीव्ही’चा वापर करण्यात येणार आहे. इटीव्हीच्या तैनातीसाठी ‘टग’ भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Exit mobile version