खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र उच्च न्यायालयात रद्द
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र उच्च न्यायालयात रद्द केलं आहे. खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असून ते रद्द करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी दाखल केली होती, त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं आज हा निकाल दिला.
या संदर्भात न्यायालयानं नवनीत राणा यांना दोन लाखाचा दंडही ठोटावला आहे. नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातुन २०१९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती त्यात त्यानी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.