नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी ८८ लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
काल दिवसभरात २५ लाख २८ हजारांहून जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी २२ लाख ५८ हजार मात्रा पहिल्या मात्रेच्या रुपात तर २ लाख ९० हजारांहून जास्त दुसऱ्या मात्रेच्या रुपात देण्यात आल्या.
काल दिवसभरात १८ ते ४४ वयोगटातल्या १३ लाख ३२ हजार जणांना लसीची पहिली मात्रा तर ७६ हजारांहून जास्त जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
महाराष्ट्रातही आतापर्यंत २ कोटी ४४ लाख ११ हजार २४८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. तर उत्तरप्रदेश दुसऱ्या, तर गुजरात तिसऱ्या स्थानावर आहेत.