Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पंतप्रधानांच्या व्लादिव्होस्टोक दौऱ्यादरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार

नवी दिल्ली :

  1. संयुक्त निवेदन “विश्वास आणि भागीदारीच्या माध्यमातून सहकार्याची नवी शिखरे गाठणे”
  2. भारत-रशिया व्यापार आणि गुंतवणूक वाढीसाठी संयुक्त रणनीती
  3. भारत आणि रशिया दरम्यान रशियन लष्करी उपकरणांच्या सुट्या भागांच्या निर्मितीत सहकार्य करण्याबाबत करार
  4. दृकश्राव्य सह-निर्मितीत सहकार्याबाबत भारत आणि रशिया यांच्यात करार
  5. रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योगातील द्विपक्षीय सहकार्याबाबत भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि रशियाच्या परिवहन मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार
  6. चेन्नई बंदर आणि व्लादिव्होस्टोक बंदर दरम्यान सागरी संचार विकसित करण्याबाबत भारताचे नौवहन मंत्रालय आणि रशियाचे परिवहन मंत्रालय यांच्यात स्वारस्य करार
  7. 2019-2022 या कालावधीत सीमाशुल्क उल्लंघन रोखण्यासाठी भारताच्या अर्थ मंत्रालयाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि रशियाच्या फेडरल सीमाशुल्क सेवेदरम्यान सहकार्याची योजना
  8. वाहतुकीसाठी नैसर्गिक वायूचा वापर करण्याबाबत भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि रशियाचे ऊर्जा मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
  9. तेल आणि वायू क्षेत्रात सहकार्य विस्तारासाठी भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि रशियाचे ऊर्जा मंत्रालय यांच्यात कार्यक्रम
  10. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील प्रांतात कोळसा खाण प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सहकार्यासाठी कोल इंडिया लिमिटेड आणि फार ईस्ट इन्व्हेस्टमेंट अँड एक्स्पोर्ट एजन्सी यांच्यात सामंजस्य करार
  11. गुंतवणूक सहकार्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात सहकार्य करार
  12. इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्त्री महासंघ आणि रॉसकॉन्ग्रेस फाऊंडेशन यांच्यात सहकार्य करार
  13. नवीन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांसाठी इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्त्री महासंघ आणि स्वायत्त स्वयंसेवी संस्था यांच्यात सामंजस्य करार
  14. नोवाटेक आणि पेट्रोनेट एलएनजी लि. यांच्यात एलएनजी व्यवसाय आणि एलएनजी पुरवठा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
  15. रॉसजिओलॉजिया आणि श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड यांच्यात सहकार्याबाबत करार
Exit mobile version