Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याची गरज – अशोक चव्हाण

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही, असं मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात विविध विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ज्या ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत, त्यांनी तिथेच आवाज उठवला तर फायदा होईल, सर्वांनी कायदेशीर लढाई लढली पाहिजे, असं ते म्हणाले. बिलोली इथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते झालं.

Exit mobile version