Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लेव्हरेज एडूची २ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

मुंबई: फॉरेन युनिव्हार्सिटी अॅडमिशन प्लॅटफॉर्म लेव्हरेज एडूने व्हेंचर डेट कंपनी ट्रायफेक्टा कॅपिटलकडून डेट फायनॅन्सिंग फेरीत २ दशलक्ष डॉलरची निधी उभारणी केली आहे. या निधीचा उपयोग कंपनी आपल्या विकासाला गती देण्यासाठी आणि भारताच्या आंतरिक भागांमध्ये शिरकाव करण्यासाठी तसेच स्टुडंट फर्स्ट दृष्टिकोन ध्यानात घेऊन प्रॉडक्ट इनोव्हेशनला वेग देण्यासाठी करेल. लेव्हरेज एडूने आत्तापर्यंत १० मिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम उभारली आहे. कंपनीचे हे पहिले डेट फायनॅन्सिंग आहे.

या वर्षाच्या सुरूवातीस या कंपनीने आपल्या सिरीज ए फंडिंगच्या भागाच्या रूपात ६.५ दशलक्ष डॉलर उभारले होते, ज्याचे नेतृत्व टुमॉरो कॅपिटलने केले होते आणि वर्तमान गुंतवणूकदार ब्लूम व्हेंचर्स आणि डीएसजी कन्झ्युमर पार्टनर्सनी त्यास समर्थन दिले होते. लेव्हरेज एडूमध्ये आणि गुंतवणूकदारांसह गोकीचे संस्थापक विशाल गोंडल, सामा कॅपिटलचे मॅनेजिंग पार्टनर ऐश लीलानी आणि पाइन लॅब्सचे मुख्य कार्यकारी अमरीश राव वगैरे प्रमुख एंजल इन्व्हेस्टर्स सामील आहेत.

लेव्हरेज एडूचे संस्थापक आणि सीईओ अक्षय चतुर्वेदी म्हणाले, “आम्ही भारताच्या प्रत्येक भागात शिरकाव करत आहोत. त्यामुळे लेव्हरेज एडूच्या बिझनेस मॉडेलमध्ये कर्जाचा उपयोग एक मोठे प्रकरण आहे. गेल्या एका वर्षात मेट्रो शहरांव्यतिरिक्त लीव्हरेज एडूने नॉन-मेट्रो बाजारात देखील प्रवेश केला आहे, जो आमच्या कस्टमर बेसचा ६०% हिस्सा आहे. ही फायनॅन्सिंग फेरी आम्हाला संबंधित प्रॉडक्ट आणि रिसोर्स इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून या हेतूला पुढे नेण्यात मदत करेल.

Exit mobile version