Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘एमसीव्हीसी’च्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप सुरू करण्याचे डॉ.रणजित पाटील यांचे निर्देश

मुंबई : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशिप) सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गृह, कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिले.

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील समस्यासंदर्भात आज डॉ.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी बोलत होते. यावेळी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयंत भावे, विजयकुमार कोल्हे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले की, उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षणाला बारावीची समकक्षता देण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करावी. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नियमितपणे शिष्यवृत्ती देण्यात यावी. तसेच शिक्षकांच्या इतर मागण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी.

Exit mobile version