Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८ हजार ९१२  नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत ३ कोटी ९३ लाख १२ हजार ९२० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी झाली.

त्यात १५ पूर्णांक १७ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. म्हणजेच ५९ लाख ६३ हजार ४२० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५७ लाख १० हजार ३५६ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख १७ हजार ३५६ रुग्ण दगावले.

सध्या राज्यात १ लाख ३२ हजार ५९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ७६ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ९७ शतांश टक्के आहे.

रायगड जिल्ह्यात काल ३७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ६ रुग्ण दगावले. आत्तापर्यंत जिल्ह्यातले एकूण १ लाख ३२ हजार २८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काल ३३० रुग्ण करोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडलं. काल ३८८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं, तर १६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या ५ हजार ४३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सांगली जिल्ह्यात काल कोरोनातून बरे झालेले ९०७ रुग्ण घरी गेले, तर ७७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात काल दिवसभरात २२ जण कोरोनामुळे दगावले. सध्या जिल्ह्यात ८ हजार ९४७ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या ४६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तर ३९ नवे रुग्ण आढळले. सध्या जिल्हाभरात ८९ कोरोनाबाधीतांवर उपचार  सुरू आहेत.

परभणी जिल्ह्यात काल ७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात काल १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्हाभरात ३१७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल ७२ रुग्ण कोरोनातून बरे झाले, तर दोन जण दगावले. जिल्ह्यात काल केवळ २० नवे कोरोनाबाधित आढळले. सध्या जिल्ह्यात ३६४ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात काल कोरोनामुक्त झालेल्या ६ जणांना रुग्णालयातून घरी सोडलं. जिल्ह्यात काल केवळ ३ नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ५० पेक्षा कमी होऊन ४७ झाली आहे.

Exit mobile version