केंद्राकडून आतापर्यंत ३१ कोटी ५१ लाखांहून जास्त लसींचा पुरवठा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लाभार्थ्यांना देण्यासाठी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून कोविड प्रतिबंधक लसीच्या, एक कोटी १५ लाखांहून जास्त मात्रा अजूनही उपलब्ध आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागानं आज सांगितलं.
केंद्र शासनानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ३१ कोटी ५१ लाखांहून जास्त लसींच्या मात्र पुरवल्या आहेत, तर येत्या तीन दिवसात आणखी २० लाख ४८ हजार मात्रा पुरवणार आहे, असही विभागानं स्पष्ट केलं.
केंद्र सरकार, देशातल्या एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लसी खरेदी करून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवणार आहे अशी माहितीही, केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.