देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचे दर ९६ पूर्णांक ८७ शतांश टक्क्यावर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे दर ९६ पूर्णांक ८७ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल सुमारे ५७ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ कोटी ९३ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सलग ४७ व्या दिवशी जास्त आहे. काल देशभरात ४० हजारापेक्षा कमी नवे रुग्ण आढळले. तर ९०७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या ३ लाख ९७ हजाराच्या वर गेली आहे. सध्या देशभरात ५ लाख ५२ हजारापेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.