Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ९७ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ९७ शतांश टक्क्यावर पोचला आहे. बुधवारी ६१ हजार ५८८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत २ कोटी ९४ लाख ८८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी ४८ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले. तर, १ हजार ५ रुग्ण दगावले. सध्या देशभरात ५ लाख २३ हजार २५७ रुग्ण उपचाराधीन आहेत. बुधवारी २७ लाख ६० हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसिकरण झालं. देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३३ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

Exit mobile version