Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोवॅक्सिनची परिणामकारकता ७८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये ही स्वदेशी बनावटीची लस कोविडची लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये ७७ पूर्णांक ८ दशांश टक्के परिणामकारी असल्याचं आढळून आलं आहे. या लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीनं आज तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले.

वेगवेगळ्या ठिकाणच्या १८ ते ९८ वयोगटातल्या २५ हजार ८०० स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. त्यात गंभीर प्रकारच्या आजारात ही लस ९३ टक्के प्रभावी असल्याचं आढळलं तर कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये ती ६५ टक्के प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे.

या निष्कर्षांबाबत भारतीय वैद्यकीय परिषदेचे सरसंचालक बलराम भार्गव यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोवॅक्सिन लस कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांवर प्रभावी ठरत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं.

२ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी या लसीवर चाचण्या सुरू असून बूस्टर डोसच्या सुरक्षेबाबतही चाचण्या सुरू असल्याची माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इला यांनी दिली.

Exit mobile version